<span class="hpt_headertitle">nadeechi katha ni vyatha</span>
Mutha River Vitthalwadi

nadeechi katha ni vyatha

नदीची कथा आणि व्यथा - State and Plight of our Rivers

A hard hitting poem on the state and plight of the rivers by Archana Mirasi, our core team member at Adopt a river Stretch, Mutha river, Vitthalwadi project. 

ती आक्रंदत होती …आहे… अजूनतरी….

पण ऐहिक गरजांचे बोळे कानात घातलेले आपण….तो आवाज आपल्यापर्यंत पोचतच नाहीये….अजूनही…..

तिचे स्वातंत्र्यच हिरावून घेतले आहे आपण…..

विविध गरजांच्या भिंती बांधून तिचे मुक्त बागडणे वाहणे थांबवले आहे आपण…..तिचा जिवंतपणा ….तिचा जीव जगवण्याचा आटापिटा, तिच्यात अक्षरशः विष मिसळून तिचा प्राणवायू संपुष्टात आणला आहे आपण….

तिला जीवनदायिनी म्हणत तिलाच मृत करतो आहे आपण ….तिचे स्वच्छ सुंदर निर्मळ रूप …तिचा उकिरडा केला आहे आपण…..तिच्या पावित्र्याची अवहेलना एवढी की तिच्यात सांडपाणी सोडले आहे आपण…

आपल्यालाच हव्या असलेल्या ऊर्जेसाठी तिला घातलेले बंध तिने मोठ्या मनाने कबुल केले आहे व ती सेवा अविरत चालू ठेवली आहे….पण वास्तव्यासाठी तिच्याच अंगावर भिंती बांधून अतिक्रमण करतो आहे आपण ……

खरंच किती हा आपला कृतघ्नपणा …..किती साहणार ती …किती सोसावे तिने…. 

या सगळ्याचे  पर्यवसान- पुर …महापूर ….आणि मग कदाचित प्रलयसुद्धा…आणि तो तिचा स्वातंत्र्य लढा आहे ….असेल   .

पारतंत्र्याची दुःख झेलेलेले आपण आपली संवेदनशीलता का कुंठली आहे…?

तिला बंदिस्त केलेल्या भिंती  पाडण्याची आता गरज आहे ,.वेळीच तिला मुक्त करण्याची आवश्यकता आहे…

तिच्या पावित्र्यामध्ये बाधा आणणारे कारखान्यातील द्रव्ये, कचरा, सांडपाणी  हे  पूर्ण  रोखण्याची गरज  आहे…नाहीतर तिचं अस्तित्त्व धोक्यात आणणारे आपण ….ती आपले अस्तित्व केव्हा धोक्यात आणेल हे सांगता येणार नाही…… आणि तो प्रतिशोध असेल… न्याय्य….

Archana Mirasi

By Archana Mirasi, Core team member, Adopt a River Stretch, Mutha river, Vitthalwadi project

Leave a Reply

Leave a Reply

  Subscribe  
Notify of