खाली दिलेल्या लिंकमधून आमची पुस्तिका डाउनलोड करा,
दत्तक घेऊया नदीकिनारा
लेखक: मनीष घोरपडे
मराठी अनुवाद: Language Service Bureau
मे महिन्याच्या एका रविवारी सकाळी ७ वाजता, विठ्ठलवाडी मंदिरासमोरच्या नदी किनाऱ्यावर आमच्यातील तीन स्वंयसेवक अदिती देवधर, ओमकार गानू आणि प्रसन्न पंचवाडकर एकत्र आले आणि त्यांनी नदीचा तो भाग दत्तक घेण्याचे ठरवले. नदी किनारा स्वच्छ करणे, आणि तेथील निसर्गाचे रक्षण करणे हे या उपक्रमाचे मुख्य उददेश म्हणून ठरविण्यात आले. त्याच वेळी असे ठरवले की या उपक्रमात सामान्य लोकांना सहभागी करून घ्यायचे आणि नदी व त्यांच्यामध्ये एक नाते निर्माण करायचे. दर रविवारी, पुंडलिक मंदिराच्या अवती- भवतीच्या नदीकाठचा कचरा साफ करण्यास त्यांनी सुरुवात केली. हे पहिल्यानंतर, तेथे ये-जा करणार्या लोकांनी, सकाळी तिथे चालण्यासाठी जाणाऱ्या लोकांनी आणि इतर अनेक व्यक्तींनी एकेक-एक करत या उपक्रमात भाग घेण्यास सुरुवात केली, आणि नकळतच २५-३० जणांचा एक गट तयार झाला. आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक लोक जसे, अश्विनी भिलारे, आदिश बर्वे, पूर्णिमाताई फडके, नीती दांडेकर इ. या उपक्रमात सामील झाले. मजेशीर गोष्ट म्हणजे श्री.पवार, जे पी.एम.सीमध्ये काम करतात, त्यांनीही या उपक्रमात सह्भाग घेतला.



Great content! Super high-quality! Keep it up! 🙂